एम्प्रेस मॉलमधील दोन इमारती अवैध..भाग ३
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
चौकट...
एम्प्रेस मॉलमधील दोन इमारती अवैध..भाग ३
चौकट...९० टक्के अवैध बांधकाम केव्हा पाडणार?एम्प्रेस मॉलच्या मंजूर बांधकाम नकाच्या व्यतिरिक्त ४५ हजार चौ.फूट जागेत अवैध बांधकाम करण्यात आले आहे. तसेच पार्किंगसाठी असलेल्या जागेत हॉटेल सुरू केले आहे. याचा विचार करता अतिक्रमण पथकाने आजवर जेमतेम १० टक्केच अनधिकृत बांधकाम तोडले आहे. उर्वरित ९० टक्के नियमबाह्य बांधकाम केव्हा तोडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकट...चौकशीची गरजएम्प्रेस मॉल मधील बांधकाम करताना नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाची चौकशी केल्यास ४५ हजार चौ.मीटरपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमानुसार बांधकाम नसल्याने येथील आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुदैवाने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे