एम्प्रेस मॉलमधील दोन इमारती अवैध...भाग २
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
चौकट..
एम्प्रेस मॉलमधील दोन इमारती अवैध...भाग २
चौकट..वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षाएम्प्रेस मॉलमधील दोन अवैध इमारती उभारण्यात आल्या आहेत. तब्बल ४५ हजार चौ. फूट जागेत हे बांधकाम करण्यात आले आहे. बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अनधिकृत बांधकामाचा काही भाग हटविला. त्यानंतर गुरुवारी कारवाई सुरू राहील, अशी अपेक्षा होती. परंतु वरिष्ठांचे आदेश नसल्याने ही कारवाई तूर्त थांबविण्यात आली आहे. पथकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. चौकट...गुरुवारी दंड भरलाच नाहीमॉल व्यवस्थापनाने नोटीस नंतरही अनधिकृत बांधकाम न काढल्याने बुधवारी अतिक्रमण पथकाने कारवाई केली. याचा दंड म्हणून पथकाने दोन लाखची डिमांड बजावली. व्यवस्थापनाने ही रक्कम गुरुवार पर्यंत झोन कार्यालयाकडे जमा करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी ती जमा केली नाही. प्रशासनाच्या आदेशालाही व्यवस्थापन जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.