शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे दोन लाचखोर जेरबंद

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

१२ हजारांची लाच स्वीकारली : शाखा अभियंता आणि लिपीक गजाआड : एसीबीची कारवाई

१२ हजारांची लाच स्वीकारली : शाखा अभियंता आणि लिपीक गजाआड : एसीबीची कारवाई
नागपूर : नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या. रमेश हिरामण कोहाड (वय ५०) आणि राहुल रमेश उंबरकर (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही महापालिकेच्या नेहरूनगर झोन क्रमांक ५ मध्ये अनुक्रमे शाखा अभियंता तसेच ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार प्रशांत पंजाबराव सौदागर हे दहलीज बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स येथे नोकरीला आहेत. बिल्डरने आराधना नगर, दिघोरी येथे दोन सहनिवास प्रकल्प (फ्लॅट स्कीम) तयार केल्या आहेत. तेथेे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन घेण्याकरिता नेहरू नगर झोन क्र. ५ मध्ये बिल्डरतर्फे रीतसर अर्ज करण्यात आला होता. २४ ऑगस्टला राहुल उंबरकरने सौदागर यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी ७ या प्रमाणे एकूण १४ हजार रुपये द्यावे लागतील, तुम्ही कोहाड साहेबांशी बोलून घ्या, असे तो म्हणाला. बिल्डरला विचारून सांगतो, असे म्हणत सौदागरने सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जैन यांनी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सौदागरने उंबरकर आणि कोहाडला लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याशी सौदेबाजी केली. १४ ऐवजी १२ हजारात सौदा पक्का केल्यानंतर मंगळवारी दुपारी सौदागर कोहाडच्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन गेले. त्यांच्याकडून लाच स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेले पोलीस उपअधीक्षक किसन पवार, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, हवालदार संजय ठाकूर, मिलिंद हलमारे, मनीष कावळे, प्रभाकर बल्ले, संतोष मिश्रा यांनी कोहाड आणि उंबरकरच्या मुसक्या बांधल्या.
--
चार दिवसात चार गजाआड
एसीबीने गेल्या चार दिवसात चार भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. शनिवारी रात्री जरीपटक्याचे पोलीस कर्मचारी पाल आणि मिश्रा या दोघांना एका बुकीकडून अडीच लाखाची लाच उकळण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली असतानाच इकडे एसीबीने कोहाड आणि उंबरकर यांना जेरबंद केले. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाईनंतर त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यात काय मिळाले. ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.
---