शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या एका चाकावर अडीच किमीचा प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 06:28 IST

हरयाणातील मनीष राठींचे नाव गिनिज बुकमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क चंडिगड : हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील जिंदरान गावातील मनीष राठी यांनी दुचाकीवर स्टंट करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला ठसा उमटविला आहे. बंगळुरुत बुलेटच्या मागील सीटवर बसून त्यांनी पुढील चाक हवेत ठेवत एकाच चाकावर अडीच किमीचा प्रवास केला. मागील सीटवर बसून इतका मोठा प्रवास केल्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मनीष राठी यांनी केलेल्या उपक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहनमनीष राठी हे २०११ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. सध्या ते हवालदार पदावर कार्यरत आहेत. मोटारसायकलवर स्टंट करण्याचा छंद असणाऱ्या मनीष यांना सैन्य अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये भारतीय सैन्याच्या स्टंट टीममध्ये सहभागी करून घेतले. सततच्या सरावाने मनीष यांनी स्वत:ला एक उत्कृष्ट स्टंटमॅन म्हणून सिद्ध केले आहे. मनीष यांच्यातील सुप्तगुणांना या ठिकाणी अधिक वाव मिळाला. सैन्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ते आज इथपर्यंतचा पल्ला गाठू शकले आहेत. 

मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमानमनीष यांच्या आई राजवंती म्हणतात की, माझा मुलगा जेव्हा शेतात जात होता, तेव्हा तो दुचाकीवर स्टंट करत होता. सैन्यात भरती झाल्यानंतर दुचाकीवर स्टंट करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. मनीष यांचे वडील धर्मबीर सिंह म्हणतात की, मुलाच्या या कर्तृत्वाने अभिमानाने छाती फुलून आली. मुलाने केवळ हरयाणाचेच नाही, तर देशाचे नाव जगात मोठे केले आहे.