शाळांमध्ये किलबिलाट सुरू
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
कळंबोली : शाळेचा पहिला दिवस, नवी पुस्तके, नवा गणवेश, नवे दप्तर..... जुन्याबरोबरन नवीन मित्रांना भेटण्याची ओढ तर दुसरीकडे सुट्टी संपल्याची नाराजी सोमवारी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होती. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या.
शाळांमध्ये किलबिलाट सुरू
नाशिक : अवैध धंद्याची बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून जाब विचारून दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार संदीप जाधव यांना जबर मारहाण करणार्या विडी कामगारनगरमधील चौघा संशयितांना न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चांडक सर्कलजवळील वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर जाधव यांना मारहाण केल्याची घटना घडली होती़शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास मुली विकत घेण्याच्या संशयावरून आडगाव पोलिसांनी महिलेसह एका रिक्षाचालकास ताब्यात घेतले होते़ पत्रकार संदीप जाधव यांनी हे वृत्त रविवारी प्रकाशित केले़ त्याचा जाब विचारण्यासाठी संशयित कल्पना यशवंत हेमाडे, विक्रांत यशवंत हेमाडे, देवेंद्र प्रेम नंदवाणी, गोविंद दिनकर गांगुर्डे (सर्व रा़ विडी कामगारनगर) हे रविवारी वृत्तपत्राच्या कार्यालयात आले़ तेथील कर्मचार्यांकडून जाधव यांचा मोबाइल नंबर घेऊन फोन केला असता ते कार्यालयात येत असल्याचे त्यांना समजले़ जाधव कार्यालयात येताच या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून हत्याराने मारहाण केली़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेले जाधव यांची सहकार्यांनी सुटका करून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित कल्पना हेमाडे, विक्रांत हेमाडे, देवेंद्र नंदवाणी, गोविंद गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती़ या चौघांनाही सोमवारी न्यायालयात हजर केले असता दिवाणी न्यायाधीश किरण वसावे यांनी मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़(प्रतिनिधी)--इन्फो--जिल्हाधिकार्यांना निवेदनपत्रकार संदीप जाधव यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे़ या हल्लेखोरांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ, प्रेस क्लब ऑफ मीडिया सेंटर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, युवा सेना यांसह विविध संघटनांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़