शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत मिळाले 99.99 टक्के, तरीही घेणार संन्यास

By admin | Updated: June 7, 2017 12:49 IST

खादा मुलगा 12 वी सायन्स विभागातून 99.99 टक्के मिळवून पास होतो तरिही करिअरचा विचार न करता तो सन्यास घेतो ही गोष्ट ऐकुन कोणालाही आश्चर्य वाटेलच.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 7-  दहावी आणि बारावीचं वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायला मुलं खूप मेहनत घेतात. कारण या मार्कांवरच त्यांच्या करिअरची पुढची दिशा ठरणार असते. पण एखादा मुलगा 12 वी सायन्स विभागातून 99.99 टक्के मिळवून पास होतो तरिही करिअरचा विचार न करता तो संन्यास घेतो ही गोष्ट ऐकुन कोणालाही आश्चर्य वाटेलच. पण असा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. तेथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या वर्शील शाह या मुलाने चांगले गुण मिळूनही संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे. 
 
पालकीमध्ये राहणाऱ्या या मुलाने 12 वीची परीक्षा सायन्स विभागातून दिली होती. मेहनतीच्या जोरावर त्याला परीक्षेत 99.99 टक्के मार्क मिळाले. या यशासाठी वर्शीलने त्याच्या आई-वडिलांकडून बक्षीस मागण्याच्या जागी सन्यास घेण्याची परवानगी मागितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्शीलच्या आई-वडिलांना त्याच्या या निर्णयाबद्दल काही पश्चाताप नाही तसंच संपूर्ण परिवार वर्शीलच्या दीक्षा समारंभाची तयारी करतो आहे. 8 जून रोजी सूरतमध्ये त्याचा दीक्षा समारंभा पार पडणार आहे. 
 
वर्शीलचे वडील जिगर शाह आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर काम करत आहेत. "वर्शीलचा परिवार आधीपासूनच अध्यात्मिक आहे. त्याची आई अती धार्मिक आहे म्हणूनच वर्शील आणि त्याच्या बहिणीला अध्यात्माची आवड असल्याचं, वर्शीलच्या वडिलांनी सांगितलं आहे. वर्शीलला शाळेला सुट्टी असताना तो फिरायला जाण्याऐवजी किर्तनाला जाणं पसंत करायचा. या किर्तनाच्या दरम्यान वर्शीलची अनेक साधू-संत आणि संन्याशी व्यक्तींबरोबर ओळख झाली होती. या सगळ्या व्यक्ती आधी डॉक्टर, इंजिनिअर आणि सीए होत्या पण स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी सन्यास घेतला होता. 
 
वर्शीलने सन्यासी होण्याच्या या निर्णयावर त्याचे आई-वडील निराश आहेत पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला होकार दिला आहे. वर्शीलने आजपर्यंत आमच्याकडे काहीही मागितलं नव्हतं. पहिल्यांदा काहीतरी मागितलं म्हणून होकार दिला, असं वर्शीलच्या वडिलांनी सांगितलं आहे.