रायबरेली : उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी गंगा नदीत १२ मुले बुडून मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एन. कोलांची यांनी दिलेल्या माहितीनुसार सरैनी पोलीस स्टेशनअंतर्गत रालपूर घाटाजवळ कंजास गावातील १८ लोक एका नावेतून गंगा नदी ओलांडत असताना त्यांची नाव नदीत बुडाली. त्यातील सहा जण पोहत सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले; परंतु त्यांच्यासोबत नावेतून प्रवास करीत असलेल्या ७ ते १६ वर्षे वयोगटातील १२ मुलांना मात्र जलसमाधी मिळाली. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून इतर मुलांचा शोध सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
गंगेत बारा मुले बुडाली
By admin | Updated: November 8, 2014 02:23 IST