शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:51 IST

मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नई दिल्ली  : ‘व्यापार युद्धा’मुळे इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चिनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रिज आणि स्मार्टफोन यांसारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.  मागणी वाढविण्यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक सवलती ग्राहकांना देतील. त्यातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्त होऊ शकतात. 

अमेरिकेने १२५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे चिनी कंपन्यांच्या वस्तू महाग होतील. टॅरिफमुळे चीनने अमेरिकेत निर्यात केलेल्या १०० डॉलरच्या वस्तूंची किंमत २२५ डॉलर होईल. त्यामुळे मागणी घटणार आहे. मागणी वाढविण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवित आहेत. याचा थेट फायदा भारतीयांना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाटाघाटींचा मार्ग झाला मोकळाअमेरिकेने आयात करास ९० दिवसांची स्थगिती दिल्यामुळे वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (फियो) अध्यक्ष एस. सी. रल्हन यांनी सांगितले. तोडग्यासाठी मार्ग निर्माण व्हावा म्हणून आयात करांस स्थगिती दिली गेली आहे, असे दिसते, असे ते म्हणाले.

अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे जगाला फटकाअमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे जागाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. या जागतिक व्यापार अनिश्चिततेचे नकारात्मक परिणाम केवळ अमेरिका आणि चीनपुरते मर्यादित राहणार नाहीत तर इतर अर्थव्यवस्थांवर, विशेषतः कमी विकसित देशांवरही त्याचा परिणाम होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

चीनमधून कशाची होते सर्वाधिक आयात?चीनमधून भारतात सर्वाधिक आयात इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची होते. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, पाॅवर सप्लायज् आणि इलेक्ट्रॉनिक सुटेभाग यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरण आयात ३०.६३ अब्ज डॉलर इतकी होती.

टॅग्स :chinaचीन