शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुपोलेव टेहळणी विमाने होणार निवृत्त

By admin | Updated: March 28, 2017 01:46 IST

शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी

नवी दिल्ली : शत्रूच्या पाणबुड्यांवर अखंड नजर ठेवून भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोविएत बनावटीच्या ‘तुपेलेव १२४ एम’ विमानांचा ताफा तब्बल २९ वर्षांच्या गौरवपूर्ण सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.पूर्वीच्या सोविएत संघाकडून घेतलेली ही लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने सन १९८८ मध्ये गोव्यात दाभोळी येथे सर्वप्रथम नौदलात दाखल झाली. जगभर नावाजलेल्या या विमानांनी तेव्हापासून नौदलाच्या प्रत्येक कारवाईत व युद्धसरावात आपली मातब्बरी दाखवून दिली. टप्प्याटप्प्याने एकूण आठ तुपोलेव विमाने नौदलात दाखल झाली. सध्या त्यापैकी फक्त तीन प्रत्यक्ष सेवेत होती.तमिळनाडूतील ‘आयएनएस राजली’ हा या विमानांच्या ताफ्याचा सन १९९२ पासून स्थायी तळ आहे. तेथेच येत्या बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत या विमानांना नौदल सेवेतून औपचारिक निरोप दिला जाईल. तुपोलेव विमानांच्या एका प्रदर्श नी दालनाचेही त्यावेळी उदघाटन होईल. सोबतच ‘साजली’ नौदल तळाचा रौप्य महोत्सवही त्यावेळी साजरा होईल.‘टीयू १४२ एम’ विमानांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळात एकूण ३० हजार तासांची विनाअपघात उड्डाणे केली. बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानानुसार त्यांच्यात अनेक वेळा प्रसंगोपात्त सुधारणा व बदल केले गेले. वयाने जुनी झाली तरी ही विमाने पूर्णपणे ‘फिट’ आहेत व काही दिवसांपूर्वी ‘ट्रॉपेक्स २०१७’ या नौदल युद्धसरावातही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती, असे एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने गौरवाने सांगितले.‘तुपोलेव’ विमाने निवृत्त झाल्यावर त्यांची जागा बोर्इंगच्या ‘पी ८१’ जातीच्या १२ सागरी टेहळणी विमानांचा ताफा घेईल. ही नवी विमाने युद्धनौकाविरोधी ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, हलक्या वजनाचे पाणसुरुंग, अग्निबाण तसेच अतिप्रगत राडार व सेन्सॉरनी सुसज्ज आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)