चेन्नई : दहा वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामी या प्रलयंकारी भूकंपात दगावलेल्यांना तामिळनाडूत विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. या भूकंपात सात हजारांहून अधिक नागरिक ठार झाले होते. चेन्नई व नागपट्टणम येथे मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात फुले वाहून नागरिकांनी आपल्या दिवंगत आप्तांचे स्मरण केले. कोळ्यांच्या संघटनेने प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. त्यात मीना बीचवर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी समुद्राला दूध अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अनेक ठिकाणी या प्रलयात ठार झालेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व कोळ्यांनी शुक्रवारी समुद्रात मासेमारी केली नाही.
त्सुनामीचा दहावा स्मृती दिन
By admin | Updated: December 27, 2014 00:19 IST