डोक्यावर दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
डोक्यावर दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न
डोक्यावर दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न
डोक्यावर दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्ननागपूर : सोमवारी रात्री ११.४५ वाजता स्मृती टॉकीज चौकात काँक्रिटच्या दगडाने डोक्यावर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन केवलसिंग चुटेले (२५) रा. सीपीडब्लुडी कॉलनी, क्वार्टर नं. ४५ काटोल रोड हे सोमवारी रात्री ११.४५ वाजता एलआयसी बिल्डिंगच्या बाजूला स्मृती टॉकीज चौक येथून जात होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यावर काँक्रिटचा दगड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संगीता केवलसिंग चुटेले (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.