शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायतांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:54 IST

मुख्यमंत्री : बसवेश्वर स्मारक उभारणीला १५ दिवसांत गती!

सोलापूर : राज्यातील लिंगायतांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले. मंगळवेढ्यातील (जि. सोलापूर) महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या उभारणीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल,अशी घोषणाही केली.होटगी मठाचे पीठाधिपती लिंगैक्य योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचा संकल्पसिध्दी समारंभ दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वीरतपस्वी मंदिर आणि ‘एसव्हीसीएस’ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झाला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह काशी, उज्जैन आणि श्रीशैल पीठाचे जगद्गुरू, होटगी मठाचे विद्यमान पीठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी,यांच्यासह विविध मठांचे मठाधिपती उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख यांनी प्रास्ताविकात ओबीसी प्रमाणपत्र आणि बसवेश्वर स्मारकासंदर्भात मागण्या केल्या. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकारसाठी राज्य सरकारने जागा दिलेली आहे. आता हे काम पुढे नेण्यासाठी येत्या पंधरा दिवसात मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील वीरशैव समाजातील नागरिकांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा जातीचा उल्लेख केलेला असतो. या उल्लेखामुळे समाजातील लोकांना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. याबाबत ओबीसी आयोगाकडे पाठपुरावा केले जाईल. यावेळी काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांचे आशीर्वचन झाले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चा