शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग

By admin | Updated: January 4, 2015 01:45 IST

मोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची तयारी चालविली असून त्याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सोमवारी पक्षसरचिटणीसांची बैठक बोलावली आहे.

नवीन सिन्हा - नवी दिल्लीमोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची तयारी चालविली असून त्याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सोमवारी पक्षसरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. हा वटहुकूम केवळ शेतकरीविरोधीच नव्हे तर संपूर्ण जनतेच्या विरोधात आहे. त्यातून सध्याच्या सरकारची मानसिकता दिसून येते, असे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केले. नव्या भूसंपादन कायद्याला तसेच त्यातील सर्व सुधारणांना विरोध करण्यासाठी या बैठकीत दीर्घकालीन योजनेवर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. हे वटहुकूम जनविरोधी आणि हुकूमशाहीचे द्योतक असून या वटहुकूमाची गरज पटवून देताना दोन मंत्र्यांनी घेतलेली भूमिकाही गरीबविरोधी आहे. जमीन मालकांच्या पुनर्वसनासंबंधी सर्व जाचक तरतुदी हटवाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. यापूर्वी संपुआ सरकारने संसदेत आणलेल्या भूसंपादन विधेयकाला भाजपने समर्थन दिले असताना या पक्षाने आता त्यात अयोग्य सुधारणा घडवून आणल्या आहेत.उपाध्यक्षपदाची निवडणूक नाही...प्रत्येक पदासाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही. नावावर सहमती होणे हाही निवडणुकीचा भाग आहे. काँग्रेसचे उपाध्यक्षपद निर्माण करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने(सीडब्ल्यूसी) घेतला होता. पक्षघटनेनुसार त्यावर जयपूर येथील अधिवेशनात अ.भा. काँग्रेस समितीने शिक्कामोर्तब केले होते. या पदासाठी निवडणूक घेण्याची गरज नाही. राहुल गांधी यांच्या पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले.च्काँग्रेसने संघटनात्मक निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. दिल्लीच्या निवडणुकांमुळे सदस्यत्व नोंदणी मोहिमेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.च्संघटनात्मक निवडणुका लांबणीवर पडणे ही सर्वसाधारण प्रक्रिया असून पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून नव्याने तारखा घोषित केल्या जातील, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.