शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचोर टोळी गजाआड

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

(फोटो)

(फोटो)
ट्रकचोरी टोळी गजाआड
५६ लाखांचा ऐवज जप्त : बुटीबोरी पोलिसांची कारवाई
बुटीबोरी : परिसरातील टोल नाक्याजवळ उभा असलेला ट्रक साहित्यासह चोरून त्यातील साहित्य व ट्रकची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीस अटक करण्यात बुटीबोरी पोलिसांना यश आले. चोरीची ही घटना २७ जानेवारी २०१५ रोजी रात्री ८.१५ वाजातच्या सुमारास घडली होती. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ लाख ६५ हजार ६६० रुपये किमतीचे ट्रकमधील साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
राजू जगन सिंह (४५, रा. सडौली, जिल्हा भरतपूर, राजस्थान), रामधार रघुवीरसिंह (४७, चमरपूर, जिल्हा धौलपूर, राजस्थान), गुरुविंदर ऊर्फ काके (४२, जलालपूर, ग्वालियर, मध्य प्रदेश), बिल्ला सरदार (५४, रा. जनपद, झाशी, मध्य प्रदेश), हरीश मनोहरलाल टेमला (४०, मनानीनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रेम प्रकाश सिंग (५०, रा. उधमसिंहनगर, उत्तराखंड) यांची हैदराबाद येथे हिंदुस्थान झिंक लि. नामक कंपनी आहे. त्यांनी टीएन-९०/५५५० क्रमांकाचा ट्रक किरायाने घेतला होता. हा ट्रक ८०० नग झिंक व २० बंडल घेऊन जात होता. दरम्यान, काही कारणास्तव चालकाने हा ट्रक बुटीबोरी परिसरातील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ उभा केला. चोरट्यांनी तो पळविला.
दरम्यान, हा ट्रक आग्रा (उत्तर प्रदेश) परिसरातील सिकंदरा भागात उभा असल्याची गुप्त माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच आग्रा गाठत राजू आणि रामधार या दोघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. या दोघांनी गुरुविंदर व बिल्ला या दोघांची नावे सांगितल्याने त्यांनाही मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. या चौघांनी हा ट्रक चोरून नेल्याचे कबूल केले तसेच तो हरीशला विकल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लगेच पुणे गाठून हरीशला ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ लाख ६५ हजार ६६० रुपये किमतीचे ट्रकमधील साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेश मेश्राम, आशिष, नितीन, नंदू आदींनी बजावली. (प्रतिनिधी)
***