शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी महामार्गावर घडला अपघात : जीप चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 01:00 IST

फोटो

फोटो
जळगाव: राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करणार्‍या ट्रक व जीपचा धक्का लागल्याने रवींद्र हरिचंद्र पाटील (वय ४८ रा.अयोध्या नगर) व कल्पना अशोक भोळे (रा.कोल्हे नगर) हे दुचाकीवरील दोनजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता शिव कॉलनी उड्डाणपुलावर झाला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी जीप चालकाला नागरिकांनी बेदम मारहाण केली.
रवींद्र पाटील व कल्पना भोळे हे दोघेजण दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.११४७) महामार्गावरुन जात असताना नाशिकहून खंडव्याला जाणारी विना क्रमांकाच्या जीपचा दुचाकीला धक्का लागला. त्याच वेळी समोरुन येणार्‍या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पाटील व भोळे हे जखमी झाले तर त्यांच्या दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तितक्यात ट्रक चालक हा तेथून पसार झाला. तर जागेवर असलेला जीप चालक संजय देवराम भामरे (वय ५५ रा.भिलकोट, ता.मालेगाव) याला जमावाने जबर मारहाण केली. रामानंद नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जीप चालकाला ताब्यात घेतले. जखमींना लोकांनीची खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघात प्रकरणात ताब्यात घेतलेली जीप ही नाशिक येथील कंपनीतून खंडवा येथे पोहच करण्यासाठी जात होती. चालक संजय भामरे याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचारी महिलेला दुचाकीची धडक
रस्त्याने पायी चालणार्‍या सुशाबाई कौतिक महाजन (रा.तुकारामवाडी) या महिलेला शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजता नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिरासमोर स्वातंत्र्य चौकाकडून येणार्‍या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एल.७०४४) जोरदार धडक दिली. यावेळी ड्युटीवर असलेले वाहतूक शाखेचे सहायक फौजदार विलास पाटील व कॉन्स्टेबल सुनील फेगडे यांनी जखमी महिलेला एका रिक्षातून खासगी दवाखान्यात पाठविले. दुचाकीस्वार प्रणव सोपान पवार (रा.दांडेकर नगर) याला दुचाकीसह ताब्यात घेतले.