शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ॲट्रोसिटी ॲक्ट -- जोड २

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

सिरसपेठ येथील असित विजय लिहितकर याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी २७ मार्च २०१४ रोजी सतीश बाबूराव मते आणि तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. असितने आरोपींसोबत धामना येथील शेतीचा सौदा केला होता. पुढे असितने त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा सौदा २०१० मध्ये ताजबाग येथील सय्यद सलीमसोबत १० लाखात केला होता. हे पैसे आम्हाला दिले नाही तर तुझा खून करू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासास स्थगिती दिली आहे.

सिरसपेठ येथील असित विजय लिहितकर याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी २७ मार्च २०१४ रोजी सतीश बाबूराव मते आणि तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. असितने आरोपींसोबत धामना येथील शेतीचा सौदा केला होता. पुढे असितने त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा सौदा २०१० मध्ये ताजबाग येथील सय्यद सलीमसोबत १० लाखात केला होता. हे पैसे आम्हाला दिले नाही तर तुझा खून करू, अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासास स्थगिती दिली आहे.
नरेंद्रनगर येथील अतुल अशोक वंजारी यांच्या तक्रारीवरून ८ एप्रिल २०१४ रोजी दिवाकर पाटणे आणि सुभाष सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतुलने आरोपींच्या रिसॉर्टवर घरगुती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाणवरून भांडण होऊन आरोपींनी अतुलला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले होते. याही प्रकरणाच्या तपासाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
विजयानंद सोसायटी येथील प्रतिभा वैरागडे यांच्याविरुद्ध त्यांचीच मोलकरीण छाया मेश्राम रा. जातटरोडी यांनी तक्रार दाखल केल्यावरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. छायाला भांडी धुण्याच्या कारणावरून वैरागडे यांनी जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले होते. वैरागडे यांनी उच्च न्यायालयात एफआयआर रद्दसाठी याचिका दाखल केलेली नाही. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली आहे. परंतु अद्याप आदेश दिलेला नाही.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै २०१४ रोजी उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी ईश्वर अरसपुरे यांनी एका अनुसूचित जातीच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला होता. या अधिकाऱ्याविरुद्ध ॲट्रोसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावर स्थगनादेश दिला होता.

अपूर्ण ---