शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूलने जिंकल्या ९२७० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेसने ग्राम पंचायतींच्या ९२७० जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकांत भाजपा हाच तृणमूल काँग्रेसचा प्रतिस्पर्धी ठरला आहे.भाजपाने ग्राम पंचायतींच्या २०७९ जागा जिंकल्या असून तो २०० जागांवर आघाडीवर आहे. माकपची पिछेहाट झाली असून त्याला ५६२ जागा जिंकता आल्या व तो ११३ जागांवर आघाडीवर आहे. सर्वात वाईट अवस्था काँग्रेसची आहे. या पक्षाने ग्राम पंचायतींच्या ३१५ जागा जिंकल्या असून तो ६१ जागांवर आघाडीवर आहे. ग्रामपंचायतींच्या ४८६५० जागांपैकी १६८१४ जागांसाठी, पंचायत समित्यांच्या ९२१७ जागांपैकी ३०५९ जागांसाठी व जिल्हा परिषदांच्या ८२५ जागांपैकी२०३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. (वृत्तसंस्था)>पंचायत समित्यांतही तृणमूल आघाडीवरया निवडणुकांत अपक्षांपैकी ७०८ उमेदवार निवडून आले, १२० जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकांतही तृणमूलच पुढे असून तिथे या पक्षाने ९५ जागा जिंकल्या असून ६५ जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या तृणमूलने १० जागा जिंकल्या असून २५ जागांवर आघाडी घेतली. दक्षिण २४ परगणा, पूर्व मिदनापूर येथे तृणमूलने अन्य पक्षांना मागे टाकले. मुर्शिदाबाद व माल्दा वगळता तृणमूल काँग्रेसला भाजपानेच टक्कर दिली. मुर्शिदाबादमध्ये तृणमूलने ग्रामपंचायतींच्या ४६६ जागा जिंकल्या असून, काँग्रेसने ८३ जागा, माकपने ४८ व भाजपाने २४ जागा जिंकल्या. पुरुलियात मात्र भाजपा तृणमूल काँग्रेसच्या काहीसा पुढे आहे.