शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यालाच ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:08 IST

मुले पळवणा-या टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून

आगरतळा : मुले पळवणाºया टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून, त्रिपुरातील आगरतळामध्ये अशाच संशयातून जमावाने एका फेरीवाल्याला बेदम मारहाण केली. त्यात तो मरण पावला आणि तीन जण जखमी झाले.अफवांमुळे निरपराध लोकांना होणाºया मारहाणीची प्रकरणे वाढत असल्याने संपूर्ण त्रिपुरात एसएमएस व इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद ्रकेल्याचे पोलीस महासंचालक ए. के. शुक्ला यांनी सांगितले.अफवांवर विश्वास ठेवू नका, असे लोकांना पटवून सांगण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका कर्मचाºयाचीही जमावाने याचपद्धतीने ठेचून हत्या केली. सुकांता चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, तो सरकारच्या माहिती विभागातील अफवाविरोधी मोहिमेचा सदस्य होता. हा कर्मचारी सबरूम येथून परतत असताना,तोही मुले पळवणाºया टोळीचा भाग असल्याची शंका तेथील रहिवाशांना आली. आपण मुले पळवत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे, असे तो जमावातील लोकांना वारंवार सांगत होता. पण त्याचे न ऐकता जमावाने त्याला ठार मारले.त्याआधी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून रोजगारासाठी आगरतळ्याला आलेल्या झाहीर खान (वय ३०) याला गुरुवारी रात्री जमावान इतके मारले की तोही मरण पावला. तो फेरीवाला आहे. झाहीरखान गुरुवारी रात्री अन्य तिघांसह कारमधून आगरतळा येथे निघाला होता. त्याच्यासोबतचे तिघे इलेक्ट्रिक वस्तू विकणारे आहेत. (वृत्तसंस्था)या प्रकारानंतर पोलीस व सरकारी यंत्रणेमार्फत लगेच उपाययोजना करण्याऐवजी राज्य सरकारने याचे खापर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर फोडले आहे. आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे प्रकार करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी केला. माकपने याचा लगेचच इन्कार केला. असले हास्यास्पद व न पटणारे आरोप केवळ भाजपाच्या लोकांनाच सुचतात, अशी टीका माकपतर्फे करण्यात आली आहे.