पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी तामिळनाडू, आंध्रात सत्ताधार्यांचा विजय
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद गर्तेत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ या दोन्ही जागा सोमवारी तृणमूलने आपल्या खिशात टाकल्या़ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील पोटनिवडणुकीतही सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली आहे़
पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी तामिळनाडू, आंध्रात सत्ताधार्यांचा विजय
नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद गर्तेत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ या दोन्ही जागा सोमवारी तृणमूलने आपल्या खिशात टाकल्या़ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील पोटनिवडणुकीतही सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली आहे़ शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांना सीबीआयने अटक केली आहे़ ------या पार्श्वभूमी----- बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकांकडे तृणमूलच्या लोकप्रियतेची लिट्मस टेस्ट म्हणून पाहिले गेले होते़ या चाचणीत तृणमूल अखेर यशस्वी ठरली़ गोव्यात सत्तारूढ भाजपने सहाव्यांदा पणजी विधानसभा जागेवर विजय नोंदवला़ माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रात संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागल्यावर ही जागा रिक्त झाली होती़़़़़़़़़़़़़़़अरुणाचलमध्ये काँग्रेसचा विजयइटानगर : अरुणाचल प्रदेशच्या प. सियांग जिल्ह्यातील लिरोंबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली़ पक्षाचे उमेदवार न्यामर करबाक यांनी आपल्या भाजप प्रतिस्पर्ध्याचा ११९ मतांनी पराभव केला़ या विजयासोबत राज्यातील ६० सदस्यीय विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या ४७ वर पोहोचली़़़़़़़़़़़़़़़आंध्र प्रदेशात तेदेपाचा विजयहैदराबाद : सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत तेलगू देसम पार्टीचे उमेदवार एम़ सुगुना यांनी आंध्र प्रदेशच्या तिरुपती विधानसभेच्या जागेवर आपले नाव कोरले़ गतवर्षी डिसेंबरमध्ये सुगुना यांचे पती आणि तेदेपा आमदार एम़ व्यंकटरमन यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती़़़़़़़़़़़़़़़तामिळनाडूत अण्णाद्रमुकतामिळनाडूच्या श्रीरंगम विधानसभा जागेवर सत्तारूढ अण्णाद्रमुकने बाजी मारली़ माजी मुख्यमंत्री जे़ जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती़कोटपोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय चमत्कार आहे़ हा लोकांनी घडवून आणलेला चमत्कार आहे़ मां, माटी, मानुषला माझा सलाम़ दिल्लीचे षड्यंत्र, भाजपचा आणि मीडियाच्या एका वर्गाकडून झालेला खोटा प्रचार याविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे़- ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस प्रमुख