शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी

By admin | Updated: April 17, 2017 03:26 IST

मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

भुवनेश्वर : मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.भाजपाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सामाजिक न्यायावर भर देताना पंतप्रधानांनी ट्रिपल तलाकचा उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र सफल करण्यासाठी मुस्लिमांमधील मागास वर्गांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा व त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असे मोदी म्हणाले. गडकरींच्या सांगण्यानुसार, पंतप्रधान असेही म्हणाले की, कोणाचीही पिळवणूक होता कामा नये. (ट्रिपल तलाकवरून) मुस्लीम समाजात संघर्ष व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. समाजात काही कुप्रथा असतील, तर त्याविषयी समाजात जागृती निर्माण करून त्यांना (मुस्लीम महिलांना) न्याय देण्याचे काम करावे लागेल.अलीकडच्या निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याचे विरोधकांनी भाजपावर केलेले आरोप साफ फेटाळून लावताना मोदी म्हणाले की, खास करून दिल्ली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे वाद मुद्दाम निर्माण केले जात आहेत. असे वाद तयार करण्याचा त्यांच्याकडे जणू कारखानाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चवरील हल्ल्यांचा, बिहार निवडणुकीच्या वेळी ‘पुरस्कार वापसी’चा व आता मतदानयंत्रांचा वाद निर्माण केला जात आहे. (वृत्तसंस्था)बोलताना काळजी घ्यासार्वजनिक वक्तव्ये करताना काळजी घ्या आणि भावनेच्या आहारी जाऊन अनुचित विधाने करू नका, अशी समज भाजपाच्या नेत्यांना देताना मोदी म्हणाले की, तुमच्या काही तक्रारी व गाऱ्हाणी असतील तर तो विषय पक्षात मांडा व पक्षातूनच तो माझ्यापर्यंत पोहोचेल.यशाने हुरळून जाऊ नकाअलिकडेच झालेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पक्षाने असाच जोर कायम ठेवायला हवा, असे सांगून मोदी म्हणाले की, लोकसभेच्या ज्या १२० जागा सध्या भाजपाकडे नाहीत त्याही जिंकण्यासाठी पक्ष विशेष मोहीम हाती घेणार आहे. पक्षाच्या यशात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. निष्णात व्यूहरचनाकार म्हणून ते एक आदर्श आहेत, अशी त्यांनी स्तुती केली.विनाकारण तलाक देणाऱ्यांवर बहिष्कारनवी दिल्ली: मुस्लिम धर्मशास्त्रात दिलेल्या कारणांखेरीज अन्य कारणांसाठी पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा, असे अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ठरविले आहे.तलाक हा मुस्लिमांच्या धर्मशास्त्राशी निगडित विषय असल्याने तो त्यांचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे यात बाहेरच्या कोणालाही हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असे बोर्डाच्या कार्यकारिणी बैठकीत ठरविण्यात आले.मात्र ट्रिपल तलाकचा पर्याय अगदीच अपवादात्मक प्रकरणांंमध्ये वापरला जाईल, याची खात्री करण्यासाठी समाजाच्या पातळीवर काही व़्यवस्था केली जाईल. ट्रिपल तलाकचा जे दुरुपयोग करतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना दंड करण्याचेही कार्यकारिणीने ठरविले, असे बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद आर. फिरंगी यांनी सांगितले.राम जन्मभूमी वादात कोर्टबाह्य तडजोड नाहीअयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादात आपसात चर्चा करण्याची सर्वोच्च न्यायालयाने केलेली सूचना आम्हाला मान्य नाही. आम्ही फक्त न्यायालय देईल तोच निर्णय मान्य करू, असा ठरावही बोर्डाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.