शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

By admin | Updated: May 11, 2017 11:09 IST

ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व व निकाल हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या 7 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 -  ट्रिपल तलाक,  बहुपत्नीत्व व निकाल हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या 7 याचिकांवर सु्प्रीम कोर्टात आजपासून (11 मे) सुनावणीला सुरूवात झाली आहे.  सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बहुविवाहावर सुनावणी होणार नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे.
 
सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या खंडपीठासमोर ट्रिपल तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली, त्यावेळी त्यांनी हा विषय घटनापीठाकडे सोपवण्याचे जाहीर केले होते.  मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला या प्रकरणांची घटनापीठाकडे सुनावणी होईल. या वेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकण्यात येईल, असे न्या. केहर यांनी स्पष्ट केले आहे. ट्रिपल तलाक म्हणजे पतीने तीनदा तोंडी तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणे आहे. या प्रकारात पत्नीला तलाकनंतर अतिशय वाईट जीवन जगावे लागते. त्यामुळे तोंडी ट्रिपल तलाक रद्द करावा, अशी मागणी आहे.  
 
दरम्यान, तलाकसारख्या संवेदनशील मुद्द्यावर तातडीने निर्णय घेता यावा, यासाठी न्यायालयाने उन्हाळ्याच्या सुट्यामध्येही या प्रकरणी सुनावणी करण्याचे ठरवले आहे. शिवाय शनिवार व रविवारीही  सुनावणी करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
 
हस्तक्षेप करता येतो का?
वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेचे उल्लंघन करतात का तसेच वैयक्तिक कायद्यांमध्ये न्यायालयाला वा अन्य कोणाही संस्थेला हस्तक्षेप करता येतो का, यावर यानिमित्ताने घटनापीठापुढे चर्चा होणार आहे.
 
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणे
जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची प्रसंगी हत्याही करू शकतो.
 
अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला याआधीच्या सुनावणीच्या वेळी सांगितले होते. तसेच मुस्लीम वैयक्तिक कायद्याबाबत निर्णय घेण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांबद्दलच प्रतिकूल मत व्यक्त केले होते.