शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 11:03 IST

पश्चिम बंगाल हिंसा आणि द्वेशाशिवाय चांगले असून येथे हिंसा भडकविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला.

नवी दिल्ली  - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरून शाह यांनी केलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले. आम्हाला उपदेश देण्याऐवजी दिल्ली व्यवस्थित सांभाळा असा सल्ला तृणमूलने अमित शाह यांना दिला.

केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी आम्हाला उपदेशाचे डोस देण्याऐवजी दिल्लीतील हिसेंत निर्दोष लोकांचा जीव वाचवू शकले नसल्यामुळे माफी मागावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगाल हिंसा आणि द्वेशाशिवाय चांगले असून येथे हिंसा भडकविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला. अभिषेक यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या धार्मिक हिंसेत आतापर्यंत 46 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अमित शाह येथे आले होते. येथे एकतृतीयांश बहुमताने भाजप जिंकेल असा दावा शाह यांनी केला होता.