शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

संघ कार्यालयावर फडकावला तिरंगा

By admin | Updated: February 23, 2016 01:29 IST

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन तेथे राष्ट्रध्वज फडकावला. काँग्रेसचे सुमारे ८00 कार्यकर्ते मोर्च्याने संघाच्या कार्यालयापाशी

इंदुर : मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन तेथे राष्ट्रध्वज फडकावला. काँग्रेसचे सुमारे ८00 कार्यकर्ते मोर्च्याने संघाच्या कार्यालयापाशी निघाले होते. त्यामुळे त्या परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले. मात्र मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरुण यादव यांच्यासह २0 कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यालयात जाण्याची पोलिसांनी मुभा दिली.संघाच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते जाताच संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना राष्ट्रध्वज लावू देण्यास आनंदाने परवानगीही दिली आणि राष्ट्रध्वज फडकावण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतही केली. इतकेच नव्हे, तर त्यांना नाश्ता आणि चहाही दिला. रा. स्व. संघाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरुण यादव म्हणाले की, भाजप आणि संघाचे राष्ट्रप्रेम तोंडदेखले आहे. भाजप आणि संघाचे नेते राष्ट्रप्रेमाच्या मोठ्या बाता करतात, पण संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज मात्र लावत नाहीत. संघाचे नेते दिनेश जैन यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. आम्ही नेहमीच राष्ट्रध्वज फडकावतो आणि त्याला वंदनही करतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)