उपासमारीला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
उस्मानाबादमधील घटना : जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झंुजगणेश गोडगेअंबी (जि.उस्मानाबाद) : एक एकर शेती़़़त्यातही पावसाने दिलेली ओढ़़़ सततची दुष्काळी स्थिती आणि हाताला काम मिळत नसल्याने होणारी कुटुंबाची उपासमार पाहवत नसल्याने एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भूम तालुक्यात अंबी गावात शनिवारी सकाळी ही घटना घडली. गंभीर ...
उपासमारीला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
उस्मानाबादमधील घटना : जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झंुजगणेश गोडगेअंबी (जि.उस्मानाबाद) : एक एकर शेती़़़त्यातही पावसाने दिलेली ओढ़़़ सततची दुष्काळी स्थिती आणि हाताला काम मिळत नसल्याने होणारी कुटुंबाची उपासमार पाहवत नसल्याने एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भूम तालुक्यात अंबी गावात शनिवारी सकाळी ही घटना घडली. गंभीर भाजलेल्या मनिषा गटकळ (३२) यांच्यावर जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे़ लक्ष्मण गटकळ यांच्याकडे एक एकर शेती आहे़ घरात दाम्पत्यासह चार मुली व एक मुलगा असे सात जणांचे कुटुंब आहे़ गटकळ यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे़ उर्वरित सहा जणांच्या या कुटंुबाचा उदरनिर्वाह एक एकरातील उत्पन्नावर व मजुरीतून मिळणार्या पैशांतून होतो़ मात्र, मागील काही वर्षांपासून अपुरा पाऊस व नापिकी गटकळ अडचणीत आले आहेत. यंदाही शेतातून काहीच उत्पन्न हाती लागणार नसल्याचे पती-पत्नी चिंतेत आहेत. गावात रोहयोची कामे नसल्याने कुटुंबाची उपासमार सुरू आहे. मनिषा यांनी शुक्रवारी रात्री दोन भाकरी करून मुलांना जेवू घातले तर गटकळ दाम्पत्यांनी पाण्यावर भूक भागविली होती. शनिवारी सकाळी लक्ष्मण काम शोधण्यासाठी घराबाहेर बाहेर गेल्यानंतर मनिषा यांनी रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)