डांगसौंदाणे : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे डांगसौंदाणे व बुंधाटे गावात स्वंयस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे डांगसौंदाणे व बुंधाटे वासियांनी सर्वपक्षीय बंद पाळून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. सर्व व्यापारी वर्गाने आपआपली दुकाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. त्यामुळे आज संपुर्ण गावात शुकशुकाट होता. येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर जाधव, अनंत दिक्षीत, डॉ. सुधीर सोनवणे, कैलास केल्हे, राजेंद्र चव्हाण, अजय केल्हे, केदा बोरसे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान गावातील बसस्थानकावर सर्व नेते व कार्यकर्त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मंुडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने डिजीटल फलक लावण्यात आले आहेत.
डांगसौंदाणे-बुंधारेत बंद गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली
By admin | Updated: June 6, 2014 00:05 IST