प्रवासी बसमधून गोमांसाची वाहतूक
By admin | Updated: July 31, 2015 00:52 IST
पणजी पोलिसांकडून 225 किलो मांस जप्त
प्रवासी बसमधून गोमांसाची वाहतूक
पणजी पोलिसांकडून 225 किलो मांस जप्त3 अटकेतपणजी : मुंबईहून गोव्यात येणार्या पॅसेंजर बसमधून गोमांसाची बेकायदा वाहतूक करणारी तिघांची टोळी पणजी पोलिसांनी गुरुवारी पकडली. गोवा प्राणी संरक्षण कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.अटक करण्यात आलेल्यांत ताखत सिंग (43), दशरथ खेम्राज गुजर (35, दोघेही मध्य प्रदेश) अणि मुझफ्फर रेहमान (46, उत्तर प्रदेश) हे संशयित आहेत. मुंबईहून मांस गोवत अणायचे आणि बाजारात विकायचे हा त्यांचा धंदा बर्याच काळापासून तयार होता. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मांसाची वाहतूक केली जात होती. मंसाचे गोळे पिशवीत घालून तशा पिशव्यांचे बॉक्स बनविले जायचे. असे चार बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण 225 किलो मांस पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शराफीन डायस यांनी दिली. तिसरा संशयित मुझफ्फर रेहमान हा या मांसाचा पणजीत पुरवठा करीत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात आणखी माहिती पोलीस मिळवीत असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यात आली.