स्पा व्यवासायात परप्रांतीया बर
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
ोबर गोमंतकीय महिलांचा सहभाग
स्पा व्यवासायात परप्रांतीया बर
ोबर गोमंतकीय महिलांचा सहभाग म्हापशा:बार्देस तालुक्यात स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायात परप्रांतातील दलालसह राज्यातील महिलांचा मोठय़ा प्रमाणावर शिरकाव या व्यवसायात झाल्याचे दिसून आले आहे. आपल्या पुरुष सहकार्याच्या मदतीने बिनबोभाटपणे हा व्यवसाय चालवत असल्याचे दिसून आले आहे. मागील तीन महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी तालुक्यात स्पाच्या नावावर चालू असलेल्या तीन वेश्या व्यवसायावर धाड घालून कारवायी केली. केलेल्या कारवायीतील दलाल परप्रांतीय असले तरी येथील लोकांच्या सहकार्यानेच व आशिर्वादामूळे हा व्यवसाय बिनबोभाटपणे चालवत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हा अन्वेशण विभाग व हणजुणा पोलिसांनी तालुक्यात तीन ठिकाणी धाड घालून स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करुन त्यातून मुलींची सुटका केली. गुन्हा अन्वेशन विभागाने 15 में रोजी चौगम रोडवरील आरजेएस आयुस्पा वर कारवाई करुन त्यातून 8 मुलींची सुटका केली होती तर 12 जणांना अटक केली होती. या प्रकरणातील दोन संशयीत आरोपी फरार आहेत. यात जोसफ डिसोजा व रायन गुदीन्हो यांचा समावेश आहे. तर प्रकरणातील एका महिलेची भुमीका अजुनपर्यंत स्पश्ट झाली नसल्याने तिची चौकशी करण्याचे काम विभागाच्या वतिने सुरु असल्याची माहिती विभागाने दिली. दुसरी कारवाई विभागानेच म्हापसा-मरोड येथील मिलाग्रीस चेंबर मध्ये डेबोरा रॉड्रिगीस स्पावर छापा टाकून केलीय यातून 3 युवतींची सुटका केली होती तसेच 7 जणांना प्रकरणात अटक केली होती. यात अँथोनी वाझ, जेन पिटर हेजल उर्फ डेबोरा या महिलेचा त्यात समावेश होता. ही महिला आलेल्या गिर्हाईकाला खास तयार केलेल्या खोलीत सोडून त्याचे शटर बंद करुन त्याला कुलूप ठोकत असे. त्यामूळे कुणालाही संशयाला जागा ठेवत नसे. तिसरी कारवाई हणजूण पोलिसांनी करुन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. 25 जुलै रोजी परप्रांतातून गोव्यात नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्या दोन टोळ्य़ातील 8 दलालांना अटक केली होती. तसेच चार मुलींची या प्रकरणातून सुटका करण्यात आली होती. या प्रकरणातील पिडीत महिलेने मोठय़ा शिताफीने स्वताची सुटका करुन घेवून हणजूण पोलिसात तक्रार नोंदवली होती. नंतर पोलिसांनी दोन वेगवेगळ्य़ा ठिकाणी घातलेल्या धाडून जुली डायस या वेर्णातील महिलेला ताब्यात घेतले होते. या प्रकरणातही अटक महिलेची महत्वाची भुमीका असल्याचे दिसून आले आहे. या व्यवसायात गुंतलेल्या महिला अपल्या पुरुष सहकार्याच्या मदतीने स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवायचे. व्यवसायसाठी मूलींना दलाला मार्फत इतर राज्यातून आणून त्यांच्यावर काही वेळा जबरदस्ती करुन हा व्यवसाय करणे त्यांना भाग पाडले जात आहे. काही महिलांना नोकरीचे आमीष दाखवून त्यांना आणण्यात असल्याचे दिसून आले आहे. या संबंधी विभागाच्या वरिश्ठ अधिकार्याशी संपर्क सादला असता त्यांनी इतर ठिकाणीही स्पावर केलेल्या कारवाईत राज्यातील महिला या व्यवसायात शिरकाव करीत असल्याचे दिसून आल्याची माहिती दिली. त्यामूळे त्या दृष्टीने विभागाने आपला तपास सुरु केल्याची तसेच त्यांचा संबंध इतर केलेल्या कारवायीशी आहे का याची चौकशी असल्याची माहिती दिली. (खास प्रतिनिधी)