दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांचा बदल्या
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांचा बदल्या मुंबईला मिळाले दोन अधिकारीमुंबई/- राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या दहा सहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यापैकी चार अधिकार्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नियमित स्वरुपात नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२ (न),(२) च्या तरतुदीनुसार या ...
दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांचा बदल्या
दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांचा बदल्या मुंबईला मिळाले दोन अधिकारीमुंबई/- राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या दहा सहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यापैकी चार अधिकार्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नियमित स्वरुपात नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२ (न),(२) च्या तरतुदीनुसार या बदल्या करण्यात आलेल्या असून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंजूरीनंतर त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आला आहे, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. अधिकार्यांची नावे अशी : (कंसात कोठून -कोठे) माधुरी कांगणे (मनमाड लोहमार्ग- राज्य महामार्ग,पुणे),भरत गायकवाड (शाहूवाडी- मुंबई),विजय मुकणे (केज,बीड-मुंबई),निलेश सोनावणे(मिरज-अंबड, जालना),धीरज पाटील (कर्जत,अहमदनगर-मिरज),चंद्रकांत अलसटवार (पैठण-मुख्यालय,औरंगाबाद ग्रामीण), परिविक्षाधीन अधिकारी डॉ.शीतल जानवे (यवतमाळ-रत्नागिरी मुख्यालय), सुरज गुरव (नांदेड-शाहुवाडी,कोल्हापूर), सोमनाथ वाघचौरे (गोंदिया-नागपूर शहर), आरती बनसोडे (सांगली-केज,बीड) (प्रतिनिधी)----------------------------