्रपारशिवनी....
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
पालोरा-साहोली मार्गाचे रुंदीकरण करा
्रपारशिवनी....
पालोरा-साहोली मार्गाचे रुंदीकरण करापारशिवनी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत तालुक्यातील पालोरा डोरली ते साहोली बाह्य वळणमार्गाच्या निर्मितीसाठी डोरली ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिग्रहित करून रस्त्याचे रुंदीकरण करावे. जेणेकरून डोरली गावातील अरुंद रस्त्यामुळे जड वाहने, एसटी बसेस व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. याबाबत डोरली ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेतला आहे. ग्रामसभेच्या मंजुरीनंतर सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निवेदन सादर केले. यावेळी ग्रा. पं. डोरली-साहोलीचे सरपंच विजय निकोसे, उपसरपंच हिरामण मारबते यांच्यासह शेकडो ग्रामस्थ हजर होते. पालकमंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात सिंगोरी, डोरली, वाघोडा, गरंडा, गवणा, पिपळा आणि पालोरा या पाच गावातून जड वाहने, मध्यम वाहने तथा दुचाकी वाहनचालकांना गावातंर्गत रस्त्याने वाहतूक करण्यास मार्ग अरुंद असल्याने सिंगोरी-पालोरा मार्गावर आणि डोरली येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामासाठी डोरली हद्दीतील गावालगतच्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून सिंगोरी-पालोरा मार्गावरील पाच गावातील हजारो नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)