शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

्रपारशिवनी....

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

स्कूल व्हॅनच्या धडकेत शेतकरी ठार

स्कूल व्हॅनच्या धडकेत शेतकरी ठार
पालोरा येथील घटना : संतप्त ग्रामस्थांनी केला रास्तारोको
पारशिवनी : भरधाव स्कूल व्हॅनने सायकलस्वारास जबर धडक दिल्याने शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आमडी फाटा-पारशिवनी मार्गावरील पालोरा बसस्थानकालगत बुधवारी सकाळी ८ वाजता घडली. मधुकर रामचंद्र नाखले (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्तारोको केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मधुकर नाखले हे सकाळच्या सुमारास सायकलने आपल्या शेतात जात होते. दरम्यान बसस्थानक परिसरात रस्ता ओलांडत असताना एमएच-२८/सी-१४७३ क्रमांकाच्या भरधाव स्कूल व्हॅनने त्यांना जबर धडक दिली. यात गंभीररीत्या जखमी झाल्याने मधुकरचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर तेथील ग्रामस्थांनी सदर स्कूल व्हॅनला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु व्हॅनच्या चालकाने सुसाट वेगाने मनसरकडे पळ काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आमडी फाटा-पारशिवनी या मार्गावर तासभर रास्ता रोको केला. टायरची जाळपोळ केली. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस तत्काळ अटक करून सदर स्कूल व्हॅन पोलीस ठाण्यात जमा करण्यात येईल, असे ठाणेदार दिलीप मसराम यांनी जमावास आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले. पारशिवनी पोलिसांनी आरोपी व्हॅनचालक राजकुमार नत्थू वैरागडे (४५, रा. पारशिवनी) यास मनसर येथून अटक केली.
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
.....
अवैध स्कूल व्हॅन
सदर स्कूल व्हॅनद्वारे मागील पाच वर्षांपासून कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची मनसर येथे ने-आण केली जाते. या व्हॅनमध्ये लहान मुलांना अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात असल्याचे काहींनी सांगितले. शिवाय, या व्हॅनला स्कूल बस म्हणून कुठलाही परवाना नाही, विमा नाही, आरटीओची परवानगी नाही तसेच अग्निशमक यंत्रणा नाही. भंगार अवस्थेतील या व्हॅनमध्ये चिमुकल्यांचा जिव टांगणीला टाकून खुलेआम वाहतूक केली जाते. या व्हॅन चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.