जागांचा पेच : सोनिया गांधी - पवारांची चर्चा होणार
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा गुंता याच आठवडय़ात सुटण्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणा:या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले.
दीर्घकाळापासूनची आघाडी तुटू नये अशीच दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागांवर ठाम असली तरी चर्चेत कोणताही अडसर येऊ नये यासाठी काँग्रेसकडून काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. आघाडी न करता स्वतंत्रपणो निवडणुकीची भाषा करणा:या नेत्यांकडून विरोध कायम आहे; मात्र आतार्पयतची चर्चा सकारात्मक झाली आहे. आघाडीबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न निकाली निघतील, असे ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: आज दिल्लीत होते.