शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग कामगारांना ‘पीपीपी’द्वारे प्रशिक्षण

By admin | Updated: July 5, 2016 04:12 IST

देशात मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेल्या महामार्ग बांधण्याच्या कामांसाठी प्रशिक्षित कामगारवर्ग उपलब्ध व्हावा व त्यासोबत स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात

नवी दिल्ली: देशात मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेल्या महामार्ग बांधण्याच्या कामांसाठी प्रशिक्षित कामगारवर्ग उपलब्ध व्हावा व त्यासोबत स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशा दुहेरी उद्देशाने खासगी व सरकारी सहभागाने (पीपीपी) महामार्ग बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्याची योजना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सोमवारी जाहीर केली.मंत्रालयाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम व्यावसायिक महासंघ आणि कौशल्यविकास संस्थांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत गडकरी यांनी या योजनेची रुपरेषा मांडली. भारत सरकारच्या कौशल्यविकास कार्यक्रमाशी सांगड घालून ही योजना राबविण्यात येणार आहे. सध्या काम करणाऱ्या कामगारांना अधिक कुशल करून आणि नव्या कामगारांना प्रशिक्षित करून सर्व संबंधितांनी दर्जेदार महामार्ग बांधकामास हातभार लावावा, असे त्यांनी आवाहन केले.स्टायपेंडची रक्कम संबंधित कामगाराच्या आधार क्रमांशी निगडित बँक खात्यात थेट जमा केली जाईल. प्रत्यक्ष बांधकाम करणारे कामगार व बांधकामाच्या ठिकाणी अवजड वाहने चालविणारे चालक यांना या योजनेत प्रशिक्षण दिले जाईल. गवंडीकाम, काँक्रिट तयार करणे व टाकणे, विविध प्रकारची बांधकामयंत्रे चालविणे यासह महामार्ग बांधकामाशी संबंधित विविध प्रकारच्या व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेत सुरुवातीला देशभर किमान २० हजार कामगारांना लगेच प्रशिक्षण देऊन कालांतराने लाखो प्रशिक्षित कामगारांची फौज तयार करण्याची मंत्रालयाची अपेक्षा आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम व्यावसायिक महासंघ, बांधकाम साहित्याचे उत्पादक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे या योजनेत मुख्य भागिदार असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)योजनेची ठळक वैशिष्ट्ये- राष्ट्रीय कौशल्यविकास कार्यक्रमाशी सांगड.- कंत्राटामध्येच प्रशिक्षणाची अट.- दर एक कोटीच्या कामामागे १० कामगारांना प्रशिक्षण.- सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षार्थीला १५ हजार रुपये स्टायपेंड- स्टायपेन्ड थेट बँक खात्यात जमा.- सरकारकडून मिळणार प्रमाणपत्र.- महामार्ग बांधकाम कंत्राटांमध्येच कामगारांना प्रशिक्षण देण्याची अट अंतर्भूत केली जाईल व प्रत्येक एक कोटी रुपये प्रकल्पखर्चामागे किमान १० कामगारांना प्रशिक्षित करण्याचे बंधन कंत्राटदारावर घालण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले.- प्रत्येक प्रशिक्षार्थीसाठी १५ हजार रुपये स्टायपेंड म्हणून देईल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.