शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दररोज बनविते १० हजार प्रवाशांचे जेवण

By admin | Updated: July 4, 2015 03:48 IST

८० सेकंदांपेक्षा कमी वेळात एकसारख्या गोल चपात्या बनविणारे भलेमोठे रोटी मेकर, टनांचा भात शिजवणारी स्टिम किटली आणि उण्यापुऱ्या तासाभरात तब्बल ४०० किलो

नवी दिल्ली : ८० सेकंदांपेक्षा कमी वेळात एकसारख्या गोल चपात्या बनविणारे भलेमोठे रोटी मेकर, टनांचा भात शिजवणारी स्टिम किटली आणि उण्यापुऱ्या तासाभरात तब्बल ४०० किलो भाजीपाला चिरणारे कटिंग मशिन, असा भारतीय रेल्वेच्या विशाल स्वयंपाकघराचा अफलातून ‘थाटबाट’ आहे.उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चालणाऱ्या या ‘सेन्ट्रल किचन’मध्ये दररोज हजारोंसाठी जेवण तयार केले जाते. स्वच्छ, आरोग्यदायी, तुलनेने स्वस्त आणि रुचकर जेवण हे या किचनचे वैशिष्ट्य बनले आहे. केवळ रेल्वे प्रवासीच नाही तर कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनेकांची किचनच्या माध्यमातून क्षुधा भागवली जात आहे.भारत आणि विदेशात तयार झालेल्या अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणांद्वारे या फूड फॅक्टरीचे काम चालते. दी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)ेचे सहायक महाव्यवस्थापक सुधीर वॉरिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकासाठी लागणारा कच्चा माल तळमजल्यावरील स्टोअर रूममध्ये ठेवला जातो. यात डाळी, तांदूळ, मसाले, शेवया आदींचा समावेश आहे. सुनियोजित पद्धतीचे लेबल लावून या मालाची साठवणूक केली जाते. नाशवंत पदार्थ दररोज सकाळी या ठिकाणी येतात. भाजीपाल, फळे वरच्या माळ्यावर कापली जातात. तत्पूर्वी ते धुणे आणि निर्जंतूक करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी क्लोरिन टॅबलेट्सचा वापर केला जातो. या स्वयंपाकघरात अलीकडे सांडपाणी प्रक्रिया संयत्र लावण्यात आले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शौचालय आणि फरशीच्या स्वच्छतेसाठी वापरण्याचा इरादा आहे. या कंपनीतील भल्यामोठ्या उपकरणांपैकी तूर्तास भाजीपाल कापण्याची स्वीडनच्या हाल्दे कंपनीचे उपकरण तूर्तास आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. एका तासात याद्वारे सुमारे ४०० किलो भाजीपाला चिरला जाऊ शकतो. इडली आणि वडा यासारख्या दक्षिण भारतीय व्यंजनांसाठी बटाटे सोलण्याचे आणि वड्यांसाठी लागणारे मिश्रण तयार करण्याचे मशिनही येथे आहे. या ठिकाणी देशविदेशातून उपकरणे मागवण्यात आली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)