पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की
पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्की
पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलिसाशी धक्काबुक्कीअदखलपात्र गुन्हा : रेल्वेस्थानकावर झाला वादनागपूर : पार्किंगच्या जागेत अडकलेली कार काढून देण्याचा तगादा लावून एका व्यक्तीने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून अश्लील शिविगाळ केली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात शनिवारी सकाळी ११.३० वाजता घडली.ओम खैरातीलाल खत्री (४२) रा. नरखेड हा सकाळी ११.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आला. त्याने कार पार्किंगच्या जागेत आपली कार टाकली. त्याच्या कारपुढे अनेक कार उभ्या होत्या. मागील भागातही त्यानंतर अनेक कार उभ्या झाल्यामुळे त्याची कार मध्येच अडकून पडली. कार पार्किंगच्या जागेत वाहनांची देखभाल करणे हे वाहतूक पोलिसाचे कर्तव्य नाही. परंतु तरीसुद्धा ओम खत्री ड्युटीवर कार्यरत वाहतूक पोलीस महावीर टेंभुर्णे याच्याजवळ आला. त्याने आपली कार काढून देण्यास सांगितले. परंतु ती आपली ड्युटी नसल्याचे वाहतूक पोलिसाने सांगितले. त्यावर त्याने वाहतूक पोलिसास शिविगाळ करणे सुरू केले. त्यानंतर त्याने केलेल्या धक्काबुक्कीत वाहतूक पोलिसाच्या शर्टाचे तीन बटन तुटून खाली पडले. त्यानंतर या कारचालकास पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी).................