शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

देवाच्या नावे व्यापार करणाऱ्यांना कोर्ट पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 02:00 IST

‘या देशाकडे ३३ कोटी देव आहेत,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यावसायिक लाभासाठी देवी-देवतांची नावे आणि प्रतिमांचा वापर करण्यावर प्रतिबंध

नवी दिल्ली : ‘या देशाकडे ३३ कोटी देव आहेत,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यावसायिक लाभासाठी देवी-देवतांची नावे आणि प्रतिमांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. ‘हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. लोकांना त्यांची श्रद्धा आणि विश्वास असलेल्या कोणत्याही देवी-देवतांच्या नावावर आपला व्यवसाय चालविण्यापासून रोखता येऊ शकत नाही,’ असे मत सर्वोच्च न्यायालयानेच व्यक्त केल्याने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून देवाच्या नावांचा व प्रतिमांचा वापर करणाऱ्यांना जणू न्यायदेवता पावली आहे.सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताव रॉय यांच्या पीठाने हा निकाल देतेवेळी असे स्पष्ट केले की,‘एखादा व्यापारी आपल्या दुकानाचे नाव लक्ष्मी स्टोअर्स असे ठेवू शकतो. तो दुकानाला आपल्या लक्ष्मी नावाच्या कन्येचे नाव देऊ शकत नाही काय, एखाद्या व्यक्तीला त्याच्या दुकानाच्या पाटीवर किंवा उत्पादनावर कोणत्याही देवाची प्रतिमा लावण्यापासून का बरे रोखण्यात यावे, त्या देवाची पूजा करणे मला आवडते. मला ठरावीक देवाचे नाव आणि प्रतिमा ठेवावीशी वाटते. अन्य कुणी मला का रोखावे, असा प्रश्न या पीठाने अर्जदाराच्या वकिलाला विचारला.‘भगवान बालाजीची भक्त असलेली व्यक्ती आपल्या मुलाचे नावही बालाजी ठेवू शकते आणि बालाजीच्याच नावावर आपला व्यापारही चालवू शकते. तुम्ही लोकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेला मुद्दा उपस्थित केलेला आहे. या देशाजवळ ३३ कोटी देव आहेत. सॉरी!’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आणि ही याचिका फेटाळून लावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)