शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडमार्क कॉम्प्लेक्सची पार्किंग बळकावली

By admin | Updated: March 14, 2016 00:03 IST

गाडगेनगर भागातील ट्रेडमार्क कॉम्प्लेक्स या संकुलाची पार्किंग लुल्ला नामक व्यक्तीने बळकावल्याचा आरोप तेथील गाळेधारकांनी केला आहे.

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बारामती येथील ॲक्सिस बँकेत १० कोटींची रक्कम परस्पर ठेवल्याचा आरोप शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या व्याजातून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची जाचक यांची तक्रार आहे.
कारखान्याने २०१४-१५ च्या थकीत एफआरपीची ८ कोटी रक्कम दिलेली नाही. त्यासाठी कारखान्याकडे पैसे उपलब्ध नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, संचालक मंडळाने १० कोटींची रक्कम बारामती येथील ॲक्सिस बँकेत ३ महिने कोणालाही कळू न देता ठेवली होती. याबाबत संचालक मंडळात वाद, आरोप-प्रत्यारोप झाल्याचा दावा जाचक यांनी केला आहे. खासगी बँकेत पैसे ठेवल्याने सभासदांच्या व्याजाचे नुकसान झाले आहे.
कारखान्याची १० हजार टन मळी रीतसर टेंडर काढून ६ हजार ७५० रुपये प्रतिटन दराने विकली होती. मात्र, तीच मळी परत ६ हजार ५० रुपये प्रतिटन दराने विक्री केली आहे. त्यामुळे या व्यवहारात प्रतिटन ७०० रुपये तोटा झाला आहे. ही रक्कम ७० लाख होते. मळी खरेदी करण्याकडून जाणीवपूर्वक डिपॉझिट घेतलेले नाही. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या दराने टेंडर दिल्यानंतर मळी उचलण्याबाबत संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कारखान्याचे, पर्यायाने सभासदांचे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जाचक यांनी नमूद केले आहे.
कार्यकारी संचालक, चिफ अकाउटंट यांनी हे प्रकार मान्य केल्याचा दावा देखील जाचक यांनी केला आहे. मात्र, या व्यवहाराचे लेखी पत्र मागणी करूनदेखील दिलेले नाही. त्यामुळे सभासदांच्या ऐच्छिक ठेवींचे भवितव्य काय, असा सवाल जाचक यांनी केला आहे. या वेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजीराव निंबाळकर, सतीश काटे, विशाल निंबाळकर, मालोजीराजे गायकवाड, अशोकराव काळे उपस्थित होते.