शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

By admin | Updated: April 20, 2015 00:39 IST

काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल, अशी ग्वाही काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दिली.मोदी सरकारने आणलेल्या सुधारित भूसंपादन कायद्यास विरोध करण्यासाठी पक्षातर्फे रामलिला मैदानावर आयोजित शेतकरी व शेतमजुरांच्या विराट रॅलीत बोलताना सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला थेट लक्ष्य केले. सबका साथ, सबका विकास, असा नारा मोदी सरकार देत आहे, मग शेतकरीच यातून का सुटला? असा सवाल त्यांनी केला. शेतकरी उन्मळून पडावा आणि अगतिक होऊन त्याने आपली जमीन द्यावी, असे मोदी सरकारचे षड्यंत्र आहे. बड्या कॉर्पोरेट घराण्यांना लाभ पोहोचवणे या एकाच उद्देशाने सरकार भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करू इच्छित आहे. शेतकरी मरो वा जगो, याचेशी सरकारचे काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप सोनियांनी केला. राहुल गांधी म्हणाले, निवडणूक काळात मोदींनी शेतकऱ्यांना अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या कार्यकाळात कुठल्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे ते म्हणाले होते. पण आजही आत्महत्या होत आहे. युरिया बाजारातून गायब आहे. खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांचा माल सडत आहे. राहुल म्हणाले की, मेक इन इंडिया व उद्योगक्षेत्राचा विकास हवाच आहे. पण जिथे शेतकऱ्यांनाच स्थान नाही, असा भारत आम्हाला नको आहे. हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. अशा शेतकऱ्यांना वगळून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. रॅलीत पक्षाच्या कुरबुरीसोनिया व राहुल व्यासपीठावर येण्यापूर्वी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली. पण यादरम्यान काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीच तेवढ्या प्रकर्षाने समोर आल्या. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर बोलायला उभे राहिले, तोच त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी भूपेंद्र हुड्डा यांचे समर्थक तंवर यांच्याविरोधात नारेबाजी करू लागले. मात्र तंवर तरीही बोलले आणि भाषण पूर्ण केल्यावरच आपल्या जागी बसले. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष प्रताप वाजवा यांनी आपल्या भाषणात लोकसभा खासदार अमरेंद्र सिंह यांना बंडखोर ठरवले. दोघांमधील मतभेद यानिमित्ताने समोर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)