शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पर्यटनास लागली ओहोटी

By admin | Updated: April 15, 2016 02:07 IST

एरवी पावसाच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गजबज राहणाऱ्या गोव्याचा पर्यटन मोसम यंदा महिनाभर आधीच संपला आहे. पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने बंद झालेली असून

पणजी : एरवी पावसाच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गजबज राहणाऱ्या गोव्याचा पर्यटन मोसम यंदा महिनाभर आधीच संपला आहे. पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने बंद झालेली असून देशी पर्यटकांचीही संख्या रोडावली आहे. किनाऱ्यांवर पर्यटकांची तुरळक वर्दळ दिसत असून यामुळे हॉटेल, शॅक व्यवसायाबरोबरच दुकानदारांनाही फटका बसला आहे. राज्यातील आघाडीचे हॉटेल व्यावसायिक व ‘टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा’चे माजी अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी यास दुजोरा देताना सांगितले की, पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने मार्चमध्येच बंद झाल्याने इंग्लंड, स्कँडिनेवियन देशांमधील पर्यटक येणे बंद झाले आहे. अवघे काही रशियन पर्यटक राहिले आहेत. महिनाभर आधीच पर्यटन मोसम संपला असून एक-षष्ठांश व्यवसायावर परिणाम झालेला आहे. एप्रिलमध्येच हॉटेलांच्या खोल्या ५५ टक्केही भरणार नाहीत, अशी स्थिती आहे.विमान कंपन्यांनी केलेल्या मनमानी तिकीटवाढीमुळे देशी पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळून ४८0 शॅकना परवाने देण्यात आले होते. पण पर्यटक नसल्याने बहुतांश किनाऱ्यांवरील शॅक गुंडाळण्यात आले आहेत. कांदोळी, बागा आदी ठिकाणी मोजकेच शॅक कार्यरत आहेत. दरम्यान, पर्यटन खात्याकडून मात्र वेगळेच चित्र उभे केले जात आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याचा दावा करण्यात येत असून या मोसमात आतापर्यंत ६९३ चार्टर विमानांमधून १ लाख ४५ हजार ८३३ विदेशी पर्यटक आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) पर्यटन महामंडळाचा इन्कारपर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांनी पर्यटकसंख्या घटल्याचे वृत्त फेटाळले. विदेशी पर्यटक आता व्हिसा आॅन अरायव्हल योजनेचा लाभ उठवत आहेत, त्यामुळे सोपस्कारही सुटसुटीत झाले आहेत. हॉटेल्समध्ये खोल्या भरलेल्या आहेत. शॅकवाल्यांनी व्यवसाय गुंडाळल्याचेही वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले. एप्रिलमध्येच किनाऱ्यावरील शॅक काढले जातात, असे त्यांनी सांगितले. यावर्षी पर्यटन मोसमात पर्यटकांची संख्या तशी जाणवलीच नाही. नववर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस वगळता पर्यटकांचा ठणठणपाळ होता.- क्रुझ कार्दोझ, अध्यक्ष, अखिल गोवा शॅकमालक संघटना