वरली अड्ड्यावर छापा; एका जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
आकोट : आकोट पोलिसांनी शहरातील खानापूरवेस भागात चालविण्यात येणार्या वरली अड्ड्यावर १३ फेब्रुवारी रोजी छापा मारून वरलीचा अड्डा चालविणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वरली अड्ड्यावर छापा; एका जणांविरुद्ध गुन्हा
आकोट : आकोट पोलिसांनी शहरातील खानापूरवेस भागात चालविण्यात येणार्या वरली अड्ड्यावर १३ फेब्रुवारी रोजी छापा मारून वरलीचा अड्डा चालविणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रानुसार, शहरातील खानापूरवेस येथील संजय शालीग्राम सिरसाट (४७) हा १३ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास शिवाजी मार्केट येथे वरलीचा अड्डा चालवित असल्याचे कळल्यावरून पोलिसांनी छापा मारला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या जवळून वरलीचे साहित्य व रोख ५३० रुपये हस्तगत केले. या प्रकरणी ए.एस.आय. विनायक टाले यांच्या तक्रारीवरून संजय शिरसाटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)..................