शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखाचा गुटखा पकडला

By admin | Updated: April 26, 2016 23:15 IST

जळगाव: अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला, मात्र कारवाईच्या धाकाने तो फरार झाला.दोन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

जळगाव: अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला, मात्र कारवाईच्या धाकाने तो फरार झाला.दोन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
कंवर नगरात एका घरात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलींद शहा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी.के.सोनवणे, संदीप देवरे कर्मचार चंदू सोनवणे, बंडू बारी,चौधरी, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक रतन आठवले व महिला कर्मचारी प्रविणा चौधरी आदींनी राजपाल यांच्या राहत्या घरी धाड टाकली. त्यात सहा प्रकारचा दहा ते बारा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. तीन मालवाहू टेम्पोद्वारे हा गुटखा आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात आणण्यात आला.
कारवाईच्या भीतीने घर केले बंद
घरात गुटख्याचा साठा असल्याने कारवाई होण्याच्या भीतीने राजपाल याने तीन तास घराचा दरवाजाच उघडला नाही, त्यामुळे पथकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी दम दिल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. साजन कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही चार हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुटख्याचा पंचनामा सुरुच होता.