शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तोमर यांची गच्छंती ?

By admin | Updated: June 13, 2015 00:01 IST

बनावट पदवीप्रकरणी अटक झालेले माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांनी पक्षनेतृत्वाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली : बनावट पदवीप्रकरणी अटक झालेले माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांनी पक्षनेतृत्वाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. वकील एच. एस. फुलका हे तोमर यांची बाजू मांडत असून सरकारकडून दिली जाणारी ही कायदेशीर मदतही काढून घेण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान ‘आप’चे आणखी एक आमदार विशेष रवी यांचा शैक्षणिक पात्रतेचा वाद उफाळून आल्यामुळे पक्षात सध्या जे सुरूआहे त्यामुळे केजरीवाल उद्विग्न झाल्याचे दिसते. दरम्यान, आपने केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तोमर यांनी बनावट पदवीच्या आधारे कायदामंत्री पद मिळवून नेतृत्वाची दिशाभूल केल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे. अशांना पक्षात खपवून घेतले जात नसल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.आपच्या अंतर्गत लोकपालकडे हा मुद्दा सोपविण्यात आला असून अहवाल सादर होताच कारवाईचे पाऊल उचलले जाईल. माजी आयपीएस अधिकारी एन. दिलीपकुमार, माजी पोलीस महासंचालक राकेश सिन्हा, शिक्षण तज्ज्ञ एस.पी. वर्मा यांचा लोकपालमध्ये समावेश आहे. तोमर खोटे बोलले तोमर यांना बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली होती. त्यांना स्वच्छ होऊन बाहेर पडण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी राजकीय कटाचा आरोप केला. त्यांच्या पदवीबाबत मिळालेली माहिती पाहता बनावट बाब समोर आली आहे. त्यांनी काही दस्तऐवज सादर करीत सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र तुम्ही कायम खोटे बोलू शकत नाहीत, असे आपच्या एका नेत्याने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)