फैजाबाद : राममनोहर लोहिया (आरएमएल) अवध विद्यापीठाने सध्या अटकेत असलेले माजी कायदा मंत्री जितेंदरसिंग तोमर हे आमचे पदवीधर नसल्याचा दावा केला आहे. तोमर यांची बीएस्सी पदवी बनावट असल्याचे या विद्यापीठाने यापूर्वीच नमूद केले असून सध्या सुरू असलेल्या तपासात सहकार्य देऊ केले आहे.तोमर यांची गुणपत्रिका आणि पदवीबाबत आरटीआयचे कार्यकर्ते प्रदीपकुमार यांनी माहिती मागितली होती. त्यावर विद्यापीठाने आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची माहिती २२ जानेवारी रोजी दिली होती. विद्यापीठ याबाबत भूमिकेवर ठाम असल्याचे विद्यापीठाचे मीडियाप्रमुख एस.एन. शुक्ला यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तोमर प्रकरणी काँग्रेसने दिल्लीत बुधवारी आंदोलन केले. (वृत्तसंस्था)
‘तोमर आमचे पदवीधर नाहीत’
By admin | Updated: June 10, 2015 23:51 IST