शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निधीविना गावात शौचालये

By admin | Updated: June 11, 2017 00:53 IST

रमजान हा मुस्लिमांसाठी पवित्र महिना असतो. या काळात मुस्लीम उपवास करतात आणि त्याचबरोबर अनेक चांगली कामेही निष्ठेने करतात. उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या

बिजनोर : रमजान हा मुस्लिमांसाठी पवित्र महिना असतो. या काळात मुस्लीम उपवास करतात आणि त्याचबरोबर अनेक चांगली कामेही निष्ठेने करतात. उत्तर प्रदेशातील बिजनोरच्या मुबारकपूर कला या छोट्याशा गावातील मुस्लिमांनीही या काळात राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत नाकारून स्वखर्चाने शौचालये बांधली. प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासारखे दुसरे कोणतेही काम मोठे आणि महत्त्वाचे असू शकत नाही, असे सांगत स्वखर्चाने शौचालये बांधताना, या गावातील मुस्लिमांनी राज्य सरकारकडून आलेली साडे सतरा लाख रुपयांची मदत न घेण्याचे ठरवले. या गावाची वस्ती आहे सुमारे ३५00. गावात ६६१ कुटुंबे राहत असून, त्यापैकी १४६ जणांच्या घरांतच शौचालये होती. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावाच्या सरपंचाला शौचालये बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याला सांगितले. त्यानुसार त्याने तो पाठवला आणि साडे सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर होऊ न, तो गावाच्या खात्यात जमा झाला. पण गावकऱ्यांनी ते पैसे घ्यायला नकार दिला. सरकारकडून मिळालेला निधी न घेता स्वखर्चाने संपूर्ण गावात शौचालये बांधणारे मुबारकपूर कला हे उत्तर प्रदेशातील पहिले गाव ठरले आहे, अशी माहिती मुख्य विकास अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)