शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे आजपासून ‘वादळी’ अधिवेशन

By admin | Updated: July 16, 2017 23:36 IST

संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेचे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. झुंडशाहीने केल्या जाणाऱ्या हत्या, काश्मीर, सिक्किममधील तणाव, शेतकऱ्यांचे आंदोलन, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन होत असलेली कारवाई या मुद्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात काही विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात येईल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंगे्रसने स्पष्ट केले की, चीनसोबतचा सिमा वाद, काश्मीरातील तणाव, गोरक्षकांचा हिंसाचार यावरुन सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, सिक्किममध्ये चीनमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी त्यांनी चीनला जबाबदार ठरविले. सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले की, ही परिस्थिती चीनने निर्माण केली आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही तो संसदेत मांडू. तृणमूलने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आझाद म्हणाले की, सरकारने चर्चेचे सर्व मार्ग बंद केले आहेत. काश्मीरात राजकीय घुसमट होत आहे. सभागृहाच्या कामकाजात काँग्रेस विघ्न आणणार नाही. पण, सरकारने विविध मुद्यांवर चर्चेसाठी पुढे यावे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे.