शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजच्याच दिवशी कारगिल युद्धात भारताने मिळवले होते निर्णायक वर्चस्व

By admin | Updated: July 4, 2016 13:49 IST

चौथ्या युद्धात कारगिलमध्ये आजच्याचदिवशी भारताने पाकिस्तानवर निर्णायक ठरणारे वर्चस्व मिळवले होते.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात कारगिलमध्ये आजच्याचदिवशी भारताने पाकिस्तानवर निर्णायक ठरणारे वर्चस्व मिळवले होते. भारताने चार जुलैच्या सकाळी पाकिस्तानी सैन्याला हुस्कावून लावत कारगिल क्षेत्रातील महत्वाच्या 'टायगर हिल'वर ताबा मिळवला. तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यामुळे कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. टायगर हिलवर भारताने मिळवलेला ताबा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता. 
रणनितीदृष्टया टायगर हिल का महत्वाचे 
 
- टायगर हिल कारगिल- द्रास क्षेत्रातील सर्वोच्च शिखर आहे. हिवाळयात घुसखोरी करुन पाकिस्तानी सैन्याने इथे ताबा मिळवला होता. टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरुन श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. उंचावर बसलेला शत्रू राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहजतेने लक्ष्य करत होता. पाकिस्तानने बळकावलेला भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी टायगर हिलवर ताबा मिळवणे त्यासाठी महत्वाचे होते. 
 
 
 
-  तीन जुलैच्या संध्याकाळी सातच्या सुमारास भारतीय लष्कराने टायगर हिल ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. १८ ग्रेनेडीयन्सकडे या मोहिमेचे नेतृत्व होते. एकूण २०० जवान या कारवाईत सहभागी होते. अल्फा, चार्ली आणि घाटक अशा तीन गटांमध्ये जवानांची विभागणी करण्यात आली होती. 
 
 
- टायगर हिलच्या लढाईमध्ये भारतीय जवानांनी सर्वोच्च शौर्य, पराक्रम दाखवला. घाटक प्लाटूनकडे १००० फूटाचा सरळ कडा चढून जाण्याचे कठिण आव्हान होते. योगेंद्र सिंह यादव सर्वप्रथम या कडयावर पोहोचला व इतर सहका-यांची दोरखंडाच्या सहाय्याने कडयावर पोहोचण्याची व्यवस्था केली. ही चढाई सुरु असताना शत्रूचे हालचालींवर लक्ष गेले व त्यांनी गोळीबार केला. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. यादवच्या खांद्यालाही गोळी लागली. पण त्याने या परिस्थितीतही शत्रूवर गोळया, ग्रेनेडचा वर्षाव केला आणि पाकिस्तानच्या चार सैनिकांना कंठस्नान घातले. या पराक्रमासाठी योगेंद्र सिंह  यादवला परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
- घनघोर युद्धानंतर चार जुलैच्या सकाळी भारताने  टायगर हिल ताब्यात घेतले. 
 
- या लढाईत पाकिस्तानचे दहा जवान ठार झाले आणि पाच भारतीय जवान शहीद झाले.