शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

१० कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

By admin | Updated: September 2, 2015 02:30 IST

कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. भाजपासमर्थित भारतीय मजदूर संघ

नवी दिल्ली : कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. भाजपासमर्थित भारतीय मजदूर संघ आणि भारतीय कामगार संघटनांच्या राष्ट्रीय आघाडीने संपातून अंग काढून घेतले असले तरी बँक आणि विमा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे आवश्यक सेवांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने चर्चा सुरूच ठेवण्याचे संकेत देतानाच देशहितासाठी संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, आवश्यक सेवांवर प्रभाव पडणार नसल्याचा दावाही सरकारने केला आहे.दहा केंद्रीय कामगार संघटनांचे देशभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रात १५ कोटी सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या गटासोबत झालेल्या चर्चेची अपेक्षित निष्पत्ती न निघाल्याने या संघटना संपावर ठाम राहिल्या होत्या. संपाचा फटका जीवनावश्यक सेवांना बसू शकतो. वाहतुकीसह वीज, गॅस आणि तेल पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे या संघटनांनी म्हटले आहे. याउलट भामसंने सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांचा मोठा वर्ग सहभागी होणार नसल्यामुळे आवश्यक सेवांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे. खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे १५ कोटी कामगार-कर्मचारी या संपात उतरतील, असे संपकरी संघटनांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)---------अंगणवाडी सेविका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घरकामगार, गिरणी, कंत्राटी कामगार अशा संवर्गातील कामगारांनी या संपाला पाठिंबा देत संपात उतरण्याची घोषणा केली आहे. तर फेरीवाले, रिक्षा व टॅक्सी चालक यांनी संपाला पाठिंबा दिला असला तरी संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे कर्मचाऱ्यांनी सेवेत खंड पडू नये, म्हणून काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी कर्मचारी महासंघाने संपात न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रभाकर देसाई यांनी दिली.