नवी दिल्ली : विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावर खर्च तुलनेत सर्वात कमी आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयईआय) नुसार भारताने शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के करणे आवश्यक आहे.
अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सहा वर्षांत भारताचा शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या २.७ टक्के आणि २.९ टक्के या दरम्यान राहिला आहे. त्यामुळे भारताने शिक्षणावरील गुंतवणूक तत्काळ वाढविण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षणावर कोणत्या देशाचा अधिक खर्चस्विडन ६.९०% ऑस्ट्रेलिया ५.५०% ब्रिटन ५.५०% अमेरिका ५.००% चीन ४.१०% थायलंड ४.००% इंडोनेशिया ३.७०% भारत २.७०%
चीनपासून धडा घेण्याची गरजnविद्यार्थ्यांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताने चीनच्या मॉडेलपासून शिकण्याची गरज.nस्विडनच्या मॉडेलपासून धडा घेत प्रशिक्षणाचा विस्तार आणि उद्योग व महाविद्यालय भागीदारी वाढीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे
भारतात माध्यमिक शाळांमध्ये मोठी सुधारणा आवश्यकदेशातील माध्यमिक शिक्षणात सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. जगाच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील कमी खर्च ही आपली आर्थिक स्थिती दर्शविते. जगातील विकसित अर्थव्यवस्था मात्र जीडीपीच्या पाच ते सात टक्के शिक्षणावर खर्च करत आहेत.अनेक देशांत प्राथमिक शिक्षण भक्कम आहे. माध्यमिक शिक्षणावर थोडी अधिक मेहनत बाकी आहे. त्याचवेळी भारतात मात्र माध्यमिक शिक्षणावर मात्र अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.भारतात माध्यमिक शाळांची स्थिती ७९.६ टक्के आहे. तर विकसित देशांत ब्रिटन (१०० %), स्विडन (१००%), अमेरिका (९८%), चीन (९२%), ऑस्ट्रेलिया (९०%), इंडोनेशिया (८२%) आणि थायलंडमध्ये (८०%) इतकी चांगली आहे.