शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Bangladesh Violence : "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 12:05 IST

भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की 'यांच्या' ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे.

कोलकाता - बांगलादेशातील मंदिरे आणि दुर्गापूजा पेडॉलवरील हल्ल्यांबाबत तृणमूल काँग्रेस आणि विचारवंतांच्या एका वर्गावर भाजपने निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की यांच्या ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. भाजप प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दावा केला, की "ट्विटरवर सक्रिय असणारे टीएमसीचे नेते आणि त्यांच्या जवळच्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी बांगलादेशातील दुर्गा पूजेच्या वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा साधा निषेधही केलेला नाही. त्यांचा निशाणा टीएमसी नेते कुणाल घोष यांच्यावर होता. 

भट्टाचार्य म्हणाले, ‘‘आपल्या दुकानातल्या मेणबत्त्या संपल्या होत्या का? आम्हाला, या हल्ल्यांच्या निषेधार्थ कुठली मेणबत्ती रॅली दिसली नाही.'' याचवेळी, शेजारील देशांतील अल्पसंख्यक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचेही ते म्हणाले. तेसेच, ‘‘आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहादींनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो," असेही ते म्हणाले.

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा - काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामीक अजेंडा काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "काश्मीरमध्ये बिगर मुस्लिमांची हत्या, बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि पुंछमध्ये 9 जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित असे आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे."

बांगलादेशातही धार्मिक हिंसाचार -बांगलादेशात एका अफवेनंतर दुर्गापुजा पेंडॉलवर हल्ले करण्यात आले आणि हिंदू देवतेच्या मूर्ती तोडण्यात आल्या. तेथे अनेक जिल्ह्यांत तणावाचे वातावरण आहे. तेथील नवाखली येथे शुक्रवारी नमाननंतर जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. यावेळी श्रद्धाळूंना मारहाणही करण्यात आली. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत, येथील धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर 200 हून अधिक हिंदू भाविक जख्मी झाल्याचे समजते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीम