शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

टी.एम. कृष्णा, बिझवाडा विल्सन यांना ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार

By admin | Updated: July 28, 2016 04:30 IST

कर्नाटकी गायक तोडूर मुदाबिसी कृष्णा (४०) आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणारे बिझवाडा विल्सन (५०) या दोन भारतीयांना २०१६

मनिला : कर्नाटकी गायक तोडूर मुदाबिसी कृष्णा (४०) आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणारे बिझवाडा विल्सन (५०) या दोन भारतीयांना २०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. आणखी चार जणदेखील या पुरस्काराचे मानकरी जाहीर झाले आहेत. बिझवाडा विल्सन हे सफाई कर्मचारी आंदोलनचे (एसकेए) राष्ट्रीय निमंत्रक असून, त्यांनी प्रतिष्ठेचे मानवी आयुष्य हा हिरावता न येणारा हक्क असल्याचे ठामपणे सांगितले, तर कृष्णा हे संस्कृतीमध्ये सामाजिक समाविष्टता वाढविणारे उदयोन्मुख नेतृत्व आहे, अशा शब्दांत त्यांचा बहुमान करण्यात आला आहे. संगीत हे वैयक्तिक आणि समाजात खरोखर खूप खोलवर बदल करणारी शक्ती असल्याचे कृष्णा यांनी दाखवून दिले, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कृष्णा यांचा जन्म चेन्नईत ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे कर्नाटक संगीतातील दिग्गजांकडे प्रशिक्षण झाले. विल्सन यांचा जन्म दलित कुटुंबात झाला व त्यांचे कुटुंब कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाण परिसरात हाताने मैला साफ करण्याचे काम करायचे. कुटुंबात उच्चशिक्षण घेणारे विल्सन हे पहिलेच आहेत. भारतात हाताने मैला साफ करणे हा मानवतेला लागलेला रोग आहे. त्यांनी हातांनी मानवी विष्ठा उचलण्याच्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी लढायचे ठरवले होते. (वृत्तसंस्था)हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठीचा विल्सन यांचा लढा ३२ वर्षांपासून सुरू आहे. १९५७ मध्ये हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. अशियातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दर वर्षी हा पुरस्कार अशियात व्यक्तीला किंवा संस्थेला नि:स्वार्थ सेवेबद्दल आणि सकारात्मक बदलांसाठी दिला जातो.इतर मान्यवरपुरस्कारप्राप्त इतर मान्यवरांमध्ये कोनचिता कॅरपियो- मोराल्स (फिलिपाइन्स), डोमपेट धुअफा (इंडोनेशिया), जपान ओव्हरसीज कार्पोरेशन व्हॉलिंटियर्स आणि व्हेंटियन्स रिस्क्यू (लाओस) यांचा समावेश आहे.