तिस्ता यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
तिस्ता यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीनतिस्तासह जावेद आनंद यांना दिलासामुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. परदेशातून निधी घेताना तिस्ता यांच्या सामाजिक संघटनेने केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. यात अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी तिस्ता व ...
तिस्ता यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन
तिस्ता यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीनतिस्तासह जावेद आनंद यांना दिलासामुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. परदेशातून निधी घेताना तिस्ता यांच्या सामाजिक संघटनेने केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. यात अटकपूर्व जामीन मिळावण्यासाठी तिस्ता व त्यांचे पती जावेद आनंद यांनी अर्ज केला होता. न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात सीबीआयने या अर्जाला विरोध केला. हे दोघेही तपासाला सहकार्य करत नाही. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास ते देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते, असा दावा सीबीआयने केला होता.मात्र याप्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवला असल्याचा युक्तिवाद तिस्ता व त्यांचे पती जावेद आनंद यांनी केला. तो ग्रा धरत न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. उभयतांना जामीन मंजूर झाल्यास ते देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकेल किंवा जनहिताच्या विरोधात असेल, असे वाटत नसल्याचे मत व्यक्त न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. तसेच तिस्ता व त्यांच्या पती यांनी तपासात सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)